डॉक्टर डॉक्टर' चित्रपटातील धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल डॉक्टर डॉक्टर' चित्रपटातील धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई :- पार्थ आणि प्रथमेशची ‘ब्यांड बाजा’ साठी धावपळ


एकमेकांच्या प्रेमात असलेले आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. एकमेकांना इम्प्रेस करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. मुलींना इम्प्रेस करणे ही सोपी गोष्ट नसते. अशाच एका मुलीला इम्प्रेस करण्यासाठी पार्थ आणि प्रथमेशने कंबर कसली आहे. मुलीला इम्प्रेस करण्यासाठी ते कोणता फंडा वापरणार याची धमाल लवकरच डॉक्टर डॉक्टर या चित्रपटातील एका धमाकेदार गाण्यातून पहायला मिळणार आहे. येत्या ३० ऑंक्टोबरला ‘डॉक्टर डॉक्टर’ ‘झीप्लेक्स’वर प्रदर्शित होणार आहे. गावाकडून येत मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहणारी मुलं मुलींना कोणकोणत्या प्रकारे इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात याची मजा अनुभवायला लावत थिरकायला लावणारं हे भन्नाट रॉकिंग गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.  


या धमाकेदार गाण्यातून मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात पार्थ आणि प्रथमेशची उडालेली धावपळ व त्यांचा अनोखा प्रेमअंदाज पहायला मिळतो आहे. वैभव लोंढे व राहुल सूर्यवंशी यांनी लिहिलेलं हे गाणं कौस्तुभ गायकवाड व वैभव लोंढे यांनी गायलं आहे. हे गाणं वैभव लोंढे यांनी संगीतबद्ध केलं आहे.


येत्या ३० ऑक्टोबरला ‘डॉक्टर डॉक्टर’ हा चित्रपट आपल्याला ‘झी प्लेक्स’ वर फक्त ९९ रुपयात पहायला मिळणार आहे. ‘झीप्लेक्स’ द्वारे मनोरंजनाचं वेगळं दालन प्रेक्षकांसाठी खुलं झालं असून ‘झीप्लेक्स’ वर प्रदर्शित होणारा ‘डॉक्टर डॉक्टर’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.


या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, गौरी सागर पाठक, सूरज दगडे-पाटील यांनी केली आहे. अमोल कागणे हे चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर आहेत. चित्रपटाचे लेखन सागर पाठक व प्रीतम एस.के.पाटील यांचे आहे. प्रितम पाटील दिग्दर्शित या चित्रपटातून प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांची धमाल प्रत्येकाला खळखळून हसायला लावणार आहे. या दोघांसोबतच रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, अमोल कागणे आदि कलाकार झळकणार आहेत. 


Song link - https://youtu.be/livb5qGDMmQ