उद्योगनगरीत करोना मृतांची संख्या दोन हजारांवर ; उशिराने उपचारांसाठी जाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


....


 पिंपरी : करोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्या पिंपपरी-चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या आता दोन हजारांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आणि करोनामुक्तांची संख्या वाढत असली तरी, गेल्या सहा महिन्यांपासून मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने चिंतेचे वातावरण कायम आहे. शहरातील करोनाचा पहिला बळी १२ एप्रिलला झाला. पहिल्या चार महिन्यात (२६ ऑगस्टपर्यंत) करोनामुळे शहरात झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून अधिक झाली होती. 


१२ऑक्टोबपर्यंत आणखी एक हजार रुग्णांच्या मृत्यूची भर पडली आहे.


 पिंपरी पालिकेच्या आकडेवारीनुसार, पहिल्या हजार मृतांमध्ये ८२५ प्रत्यक्ष शहरातील रहिवासी होते. तर, १६९ मृत हद्दीबाहेरचे होते. त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार होत होते. 


सोमवारी मृतांच्या संख्येने दोन हजाराचा आकडा ओलांडला, तेव्हा १४४१ इतके शहरातील रहिवासी आहेत. तर, ५६६ हद्दीबाहेरचे आहेत. १९ एप्रिलला एकाच दिवशी सर्वोच्च ४१ मृतांची संख्या नोंदवण्यात आली होती. त्यानंतर, २६ सप्टेंबरला एकाच दिवशी ६५ जणांचा मृत्यू झाला होता. अनेक दिवस दररोज २० ते २५ दरम्यान मृत्यू होत होते. अलीकडचे काही दिवस मात्र मृत्यूंची संख्या कमी झालेली दिसते. शहरातील मृत्युदर कमी आहे. यापुढील काळातही मृत्यूचे प्रमाण कमी होत जाईल. करोनाबाधित रुग्ण खूपच उशिराने उपचार सुरू करतात, ही मोठी अडचण आहे. तेव्हा आपल्या हातात काहीच राहत नाहीत. त्याकरिता नागरिकांनी वेळेत आरोग्य तपासणी करावी, चाचण्यांना सामोरे जावे. वेळीच उपचार घ्यावेत. घाबरून जाऊ नये. मात्र, खबरदारी घ्यावी. 


डॉ. पवन साळवे, 


आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या