पुणे प्रवाह न्युज पोर्टल
दलित सेना पुणे शहर जिल्ह्याच्यावतीने मनिषा वाल्मिकी या युवतीवर
पुणे :-चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली
या सर्व घटनेचा निषेधार्थ तीव्र निदर्शने
दलित सेना पुणे शहर जिल्ह्याच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तरप्रदेशमधील हाथरसमधील मनिषा वाल्मिकी या युवतीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली या सर्व घटनेचा निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली . यावेळी मनिषा वाल्मिकीच्या आरोपीना फाशी द्या व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजीनामा द्या , उत्तरप्रदेश सरकारने मानवी हक्कांची पायमल्ली केल्यामुळे हे सरकार त्वरित बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी व मनीषा वाल्मिकीच्या आरोपींची केस जलदगती न्यायालयात चालवून त्यांना त्वरित फाशी द्यावी , अशी मागणी निवेदनात करण्यात आली .
यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले . या निदर्शनात दलित सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील यादव , विदर्भ अध्यक्ष प्रदीप नगराळे , राज्य उपाध्यक्ष वसंतराव बोले , पिणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत शेलार , महिला आघाडी पुणे अध्यक्षा आरती जमदाडे , पुणे शहर अध्यक्ष प्रदीप गायकवाड , पिंपरी चिंचवड अध्यक्ष शशिकांत कांबळे , महिला आघाडी सरचिटणीस सीमा बोले , शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे , शहर सरचिटणीस अमोल सोनवणे , शहर उपाध्यक्ष सूर्यकांत जगताप व संघटक चिटणीस अविनाश मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते