एम.एच.आर.डी.उच्च शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंकित इंस्टीट्यूशन इनोव्हेशन काउंसिलतर्फे लवळे येथिल भारती विद्यापीठचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांना प्रतिष्ठेचे ४.५ स्टार दर्जाचे मानाकन प्राप्त.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध उच्च शिक्षण संस्थामधून शिकणाऱ्या विद्यार्थ्याना चालना देऊन नव-उद्योजक व संशोधनाला प्रोत्साहन देऊन व्हायब्रंट लोकल इनोव्हेशन इको-सिस्टीम तयार करणे हे मूळ उदिष्ट समोर ठेऊन एम.एच.आर.डी. मंत्रालय भारत सरकार अंकित इंस्टीट्यूशन इनोव्हेशन काउंसिल (आय. आय. सी.) ची स्थापना करण्यात आलेली आहे.


या अतंर्गत भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये लोकल ई .सेल च्या स्थापना करण्यात आलेल्या आहेत. व त्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी उत्तम संज्ञात्मक क्षमता विकसित करणे , त्यांच्यातील नव कल्पनांना प्रोत्साहीत करण्यासाठी विविध व नाविन्यपूर्ण आणि उद्योजकता वाढीस लागावी यासाठी यशस्वी उद्योजक , गुंतवणूकदार, व्यावसायिक यांच्या समवेत कार्यशाळा ,परिसंवाद, चर्चासत्रे यांचे आयोजन करणे तसेच नवीन उद्योगिक संकल्पना प्रस्थापित करू इच्छिणार्या विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक संघ तयार करणे, ह्यॅकॅथोन स्पर्धाचे आयोजन करणे अशा उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या 


त्यानुसार लवळे येथील भारती विद्यापीठचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे गतवर्षीच आय.आय.सी. लोकल ई .सेल ची स्थापना व नोंदणी करण्यात आली. तुलनेने नवीनच असलेल्या या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अवघ्या वर्षभरातच आय.आय.सी. च्या निर्देशांप्रमाणे उद्योजकता व संशोधन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यामध्ये चालना उत्पन्न करण्यासाठी अनेक दर्जेदार कार्यक्रमाचे सूत्रबद्ध व यशस्वी आयोजन करण्यात आलेले होते. याचाच परिपाठ म्हणून अल्पावधीतच येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनी मिळुन सुमारे ३५ पेटंटस फाईल केलेले आहेत व चार स्टार्ट-अप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे.


भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाच्या आय. आय. सी. ने विद्यार्थ्यासाठी केलेल्या याच प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत महाविद्यालयाला प्रतिष्ठेचे ४.५ स्टार दर्जाचे मानांकन देऊन सन्मानित केलेले आहे तसेच प्रा . डॉ. निधी जैन व प्रा .प्राजक्ता पवार या महिला प्राध्यापकां ची आय.आय.सी. चे इनोव्हेशन ऍम्बॅसेडर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .एन. पाटील यांच्या समर्थ मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे तसेच आयआयसी च्या सर्व प्रेरित सदस्यांच्या प्रयत्नां मुळेच हे यश संपादन करण्यात महाविद्यालयाला यश मिळाले असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या आयआयसीच्या संचालिका प्रा . डॉ. निधी जैन यांनी केले.