जनशक्ती विकास संघाच्या वतीने, उत्तर प्रदेश येथील हाथरस, बलरामपूर, आजमगढ या शहरात झालेल्या सामुहिक बलात्काराचा भाजप यु पी सरकारचा जाहिर निषेध

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


**


*पुणे :-* वरील विषयास अनुसरून उत्तर प्रदेश येथील हाथरस, बलरामपुर, आजमगढ, या शहरात अमानुष प्रकारे सामुहिक बलात्कार झाले आहेत माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य उत्तर प्रदेश मध्ये घडत आहेत आणि भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुग गिळून गप्प बसले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जणू काय बलात्काराचे केंद्र बनत चालले आहे. तेथे महिलांना काहीच किंमत दिली जात नाही एवढा मोठा निंनदनीय प्रकार घडत असतांना यूपी सरकार कठोर कार्यवाही करताना दिसत नाही कोणाला तरी वाचवण्यामध्ये सरकाराचे प्रयत्न चालु आहेत. मनिषा वाल्मिकी या दलीत तरूणीचा अमानुष सामुहिक बलात्कार होतो आणि तिची जिभ कापली जाते आणि पाठीचा कणा मोडला जातो त्यानंतर तिला शेतात टाकुन दिले जाते. १४ सप्टेंबर रोजी तरूणीने दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात शेवटचा श्वास


घेतला यु.पी.मध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरून लक्षात येते की, महिला सुरक्षित नाही. महिलांना सुरक्षा यु.पी.चे सरकार देऊ शकत नाही यु पी. सरकारचा पोलीस प्रशासन यांची भूमिका संशयास्पद आहे याची रष्टनी गंभीर दखल घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी व त्या सर्व वरमाना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी जनशक्ती विकास संघाचे प्रवक्ते मुल्ला (सर)यांनी केली