“तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…”;  मे.न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


“तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…”; 


मे.न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर....


मे.अहालाबाद :- उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर हाथरस प्रकरणाची सुनावणी सुरु झाली. सुनावणीदरम्यान मे.उच्च न्यायालयाने अप्पर पोलीस महानिर्देशक, कायदा आणि सुव्यवस्था (ए.डी.जी.) प्रशांत कुमार यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात नाराजी व्यक्त केली. 


पीडितेच्या वकील सीमा कुशवाहा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मे.न्यायालयाने कुमार यांना काही प्रश्न विचारले. तुमच्या मुलीबरोबर असं काही झालं असतं आणि अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्यात आले असते तर कसं वाटलं असतं, असा प्रश्न विचारल्याचा दावा सीमा कुशवाहा यांनी आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. 


मे.न्यायालयामध्ये उपस्थित असणाऱ्या पीडितेच्या वकील असणाऱ्या सीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायाधिशांनी पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतले. 


मे.न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबियांकडे घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. न्या. पंकज मित्तल आणि न्या. राजन रॉय यांच्या खंडपीठाने पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असा शब्द दिला. सीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार मे.न्यायालयाने अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले ज्याची उत्तर अधिकाऱ्यांना देता आली नाही. या प्रकरणातील पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सुनावणीदरम्यान हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार ळक्षकार यांनी मे. न्यायालयासमोर कथित बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेच्या मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. 


यासाठी जिल्हा प्रशासनावर उत्तर प्रदेश सरकारने कोणताही दबाव आणला नव्हता असं स्पष्ट केलं.