मृत समजून मोठ्या भावाला ठेवलं फ्रीझरमध्ये,  पण दुसऱ्या दिवशी घडलं भलतंच

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मृत समजून मोठ्या भावाला ठेवलं फ्रीझरमध्ये, 


पण दुसऱ्या दिवशी घडलं भलतंच…....


तामिळनाडू :- मध्ये घडलेली एक आश्चर्यकारक घटना नुकतीच समोर आली आहे. 


यामध्ये एका ७४ वर्षीय वृद्ध व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांनी मृत समजून रात्रभर फ्रिझर बॉक्समध्ये ठेवलं. 


मात्र, ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी जिवंत असल्याचं समोर आलं. 


दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीची सुटका करुन त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे.


 पोलिसांच्या माहितीनुसार, बालासुब्रमनिया कुमार (वय ७४, रा. कंधामपत्ती, जि. सालेम) असं फ्रिजरमध्ये ठेवलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. 


बालासुब्रमनिया हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.


 ते आपला ७० वर्षीय लहान भाऊ सर्वानन आणि बहिण गीता यांच्यासोबत राहत आहेत. 


सर्वानन यांच्या माहितीनुसार, “त्यांना वाटलं की त्यांचा भाऊ बालासुब्रमनिया यांचे निधन झाले आहे. 


त्यामुळे आम्ही मृतदेह ठेवण्यासठी फ्रिजर बॉक्स मागवून घेतला.


 अंत्यसंस्कारासाठी दुपारी आमचे नातेवाईकही घरी आले.


” इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे. 


मात्र, एन.डी.टी.व्ही.ने आपल्या वृत्तात, बालासुब्रमनिया कुमार यांच्या नातेवाईकांनी ते आजारातून बरे झालेले नसताना रुग्णालयातून डिस्चार्ज घेत घरी नेले त्यानंतर त्यांचा मृत्यू व्हावा यासाठी त्यांना फ्रिजरमध्ये ठेवल्याचं म्हटलं आहे. 


दरम्यान, फ्रिजर कंपनीचा कर्मचारी फ्रिजर बॉक्स घेऊन जाण्यासाठी सर्वानन यांच्या घरी पोहोचला तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. 


फ्रिजर बॉक्समध्ये ठेवलेल्या व्यक्तीचा श्वास सुरु असल्याचे त्याचे लक्षात आले. 


त्यानंतर त्याने पोलिसांनी याची खबर दिली त्यानंतर पोलिसांनी बालासुब्रमनिया यांना वाचवलं.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)