पहीले डॅशिंग महिला पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते (एस.पी.) मंगळवेढयातील अवैध धंदे रोखणार का ?

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



सोलापुरः :- शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन संपल्यानंतर अवैध व्यवसायाने ठिकठिकाणी आपले डोके वर काढले असून डॅशिंग महिला पोलिस अधिकारी अशी ओळख असलेल्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते ह्या मंगळवेढा तालुक्यातील अवैध व्यवसाय हद्दपार करून सर्वसामान्य नागरिकांचे उघडयावर पडत असलेले संसार वाचविणार का ? 


असा जनतेमधून सूर निघत आहे.


लॉकडाऊन संपल्यानंतर मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात छुप्या मार्गाने चालणारा मटका व्यवसाय खुल्लमखुल्ला सुरु झाला असून काही ठिकाणी बिन्दास्त पणे लिखीत स्वरूपातील चिठ्ठीच्या माध्यमातून तर काही ठिकाणी फोनच्या व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून आकडयाची देवघेव सुरु असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.


सातारा जिल्हयात कार्यरत असताना डॅशिंग महिला अधिकारी अशी ओळख असलेल्या नूतन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी नुकताच सोलापूर जिल्हयाच्या पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारला आहे.


 जिल्हयाच्या ग्रामीण भागात मागील वर्षभरापासून मटका,दारू,अवैध वाळू व्यवसाय,गुटखा,खाजगी सावकारी,चंदनाची तक्सरी आदी व्यवसायाने फार मोठ्याप्रमाणात आपले डोके वर काढले आहे.असे प्रत्यक्ष डोळ्यांने पाहतास मिळत आहे. 


कर्नाटक राज्य सीमेलगत असल्याने येथे फार मोठया प्रमाणात तेथून गुटखा मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात तसेच अन्य ठिकाणातुन व्यापारी घेवून जात असल्याने मंगळवेढा हे सद्यागुटख्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जात आहे.याला अटकाव (आळा घालण्यासाठी) करण्यासाठी मंगळवेढा सीमेवर पोलिस चौकीची फारच नितांत गरज आहे.


गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक जनता पोलिस चौकीची मागणी करतच आहेत.असे असतानाही याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याचा जनतेचा आरोप करत आहेत.


मंगळवेढयापासून भिमा व माण नदया वहात असल्याने रात्री बेरात्री फारच मोठया प्रमाणात अवैधरित्या शासकीय मालमत्तेची चोरी करून वाळू व्यवसायिक आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.यात काही पोलिस कर्मचार्यांचाही समावेश असून मात्र वरीष्ठ पोलिस अधिकारी कुठलीच कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याने नागरिकांतून अशा वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांविरूध्द संताप व्यक्त होत आहे.


मंगळवेढा शहरालगत असलेल्या दोन्ही ग्रामपंचायतीने अवैध व्यवसायाबाबत बहुमताने लेखी ठराव करून याला विरोध करीत त्याच्या प्रती पोलिस प्रशासनास देवूनही बिनधास्तपणे धाब्यावरून दारू विक्री खुल्लमखुल्ला सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.


परिणामी लेखी ठराव करूनही स्थानिक पोलिस प्रशासन आपले हात ओले करण्याच्या नादात लेखीठरावाला दुर्लक्ष(दुय्यम स्थान) करीत असल्याचा बोललेजातच आहे. 


राज्य उत्पादन शुल्कविभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी महिन्याकाठी आपले हात ओले करण्यासाठी फक्त येवून कारवाई न करताच रिकाम्या हाताने सोलापूरला निघून जात असल्याच्या तक्रारी करत आहेत.


मात्र नूतन पोलिस अधिक्षक सो.यांनी आपला कार्यभार स्विकारल्यानंतर किमान त्यांच्या कामाच्या पद्धतीचा अंदाज येईपर्यत तरी अवैध व्यवसाय बंद ठेवले जात असल्याचा आत्तापर्यंतचा अनुभव व इतिहास आहे. 


चक्क पोलिस अधिकार्‍यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरही मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अवैध व्यवसाय सुरु असल्याने नागरिकांमधून वरिष्ठ अधिकार्‍यांची भिती आहे की नाही ? असा सवाल करीत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.