सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न


पुणे:- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य इमारतीमधील सरस्वती सभागृहामध्ये संपन्न झाला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


      या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठातील प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.


      डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील पुस्तकांचे प्रदर्शन जयकर ग्रंथालयात भरवण्यात आले आहे. याशिवाय जयकर ग्रंथालयातर्फे "वाचकांना ग्रंथवाचनासाठी प्रेरित करण्यामागे ग्रंथपालांची भूमिका" या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार यांनी या व्याख्यानात मार्गदर्शन केले


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)