पुणे प्रवाह न्युज पोर्टल
तामिळनाडू :- द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) आणि राष्ट्रीय जनता दलाचे घटक पक्ष असणाऱ्या डी.एम.के.ने तामिळनाडूमधील रेल्वे प्रवाशांना रेल्वे तिकीट कनफॉर्म झाल्याचे मेसेजेस हिंदीमध्ये येत असल्याचे सांगत याचा निषेध केला आहे.
दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.
दक्षिण चेन्नईच्या द्रमुकच्या खासदार तामिलाची थांगपांडियन यांनी ट्विटरवरुन हिंदीमध्ये येणाऱ्या मेसेजेसचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत आपला आक्षेप नोंदवला आहे.
“हिंदी कोणावर लादली जाणार नाही असं आश्वासन भारत सरकारने दिलेलं असतानाही हिंदी भाषेत मेसेज पाठवले जात आहेत.
हिंदी ही मुख्य भाषा नसणाऱ्या राज्यांवर हिंदी लादणं बंद करा,
” अशा शब्दांमध्ये थांगपांडियन यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी रेल्वे मंत्रालयाचे ट्विटर हॅण्डल टॅग केलं आहे.
या प्रकरणामध्ये रेल्वेने योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हिंदी बोलली जात नाही अशा राज्यांमध्ये आय.आर.सी.टी.सी.च्या सेवा इतर भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. द्रमुकच्या खासदार खासदार कनीमोळी यांनाही हिंदीच्या सक्तीचा विरोध केला आहे.
त्यांनी केंद्र सरकारचाच संदर्भ देत, “ते लोकांच्या भावनांचा आदर करत नसून सतत हिंदी भाषा इतर राज्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत,
” अशा शब्दांमध्ये टीका केली आहे.