माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे बरोबरच "पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार" मोहिमेचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते शुभारंभ

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


**


*पुणे :-* माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमें बरोबरच पुण्याचा निर्धार कोरोना हपार मोहिमेचे ा महापीर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले कि, कोरोना या विषाणूशी लढताना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच पुणे महानगरपालिका या सगळ्या यंत्रणा अहोरा काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत दुसऱ्या टप्प्याबरोबरण निर्णायक वळणावर पुण्याचा निर्धार कोरोना हदपार या गोहिमेची सुर्वात होत आहे मागील ७ महिन्यापासून पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, सेक्कानी कोरोना या विषाणू विरुद्ध लढताना महत्वाची भूमिका बजावली आहे. या कोरोनाच्या अनपेक्षित आलेल्या संकटकाळामध्ये सगळ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, सर्व राजकीय पक्ष, स्व पुणेकर नागरिक एकत्र लढाई करत आहेत, आज महत्वाच्या टप्प्यावर कोरोनाी स्थिती आलेली आहे. प्रत्येक पुणेकराने आपली स्वताची काळजी. आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. पुण्यामध्ये प्रत्येक नागरिकाने संयम ठेवून, स्वताच्या भावनेला, उत्साहात्या मुरड धासून व सामाजिक भान ठेवल्यामुळेच कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. कोरोना विषाणू हा आता नियंत्रणात आलेला आहे. त्याला यापुढे वाढवून न देण्याची जाबदारी हि आता आपी आहे. आज आरोग्य यंत्रणा हि मोठ्या प्रमाणात सक्षम झालेली असून आता बेड उपलब्ध आहेत तसेच सणवाहिकेता तक्रार नाही. सगळ्यात लवकर कोरोनामुक्त पुणे शहर करण्याचा संकल्प मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला याप्रसंगी शासनाचे वैदयकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुखे यांनी सांगितले कि, मागील ८ महिने सर्वानी अहोरात्र काम केलेले असून त्यांच्या प्रयत्नाना आज यश आलेले आहे. पुणे महापालिकेच्या सर्व कर्मचार्यानी फार


चागले काम केलेले आहे. परंतु अजून कोरोना पुण्यातून हद्पार झालेला नाही. पुण्यातून कोरोना हद्दपार करण्याकरिता पुणेकरांचा सहभाग असणे आवश्यक आहे. याकरिता मास्कचा नियमित वापर, वारंवार हात पुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे आणि सुरक्षित अंतर राखणे या गोष्टींची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. याप्रसंगी विभागीय आयुक्त, पुणे विभाग मा. सौरभ राव यांनी सांगितले कि, पुणे शहरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी कोविड-१५ विरोधात यशस्वी मुकाबला करण्याकरिता सामाजिक कृतीशील समूहाची (टास्क फोर्स) ची यंत्रणा काम करेल, यामध्ये लोक जागृती, लोक सहभागाद्वारे लोकामधील कोविश-१९ बाबतचे गैरसमज दुर करणे, प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती देणे, शासन व नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद साधणे, इत्यादी स्वरूपा


काम टास्क फोर्स मार्फत करण्यात येणार आहे. गाप्रसंगी मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले कि, गेले ८ महिने आपले कोविड-१६ शी युद्ध सु असून आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. याकरिता मास्कचा नियमित वापर, वारंवार हात पुणे, विनाकार


घराबाहेर न पडणे आणि सुरक्षित अंतर राखणे या गोष्टी पुणेकरानी कराव्यात असे आवाहन केले.


सदर कार्यक्रम प्रसंगी मा. उपमहापौर सरस्वतीताई शेडगे, मा. विरोधी पक्षनेत्या दिपाली पुमाळ, समिती अध्यक्ष माधुरी सहस्रबुद्धे, मा. सभासद सुभाष जगताप, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमनार, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष श्री शांतीलाल मुत्या उपस्थित होते.


माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमें बरोबरच पुण्याचा निर्धार कोरोना हापार" मोहिमेची संपूर्ण माहिती


आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मा. उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेडगे यांनी केले.