कारवाई करणाऱ्या गुगलला पेटीएम (Paytm) चं आव्हान ;  लॉन्च केलं स्वत:चं अ‍ॅप स्टोअर....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 कारवाई करणाऱ्या गुगलला पेटीएम (Paytm) चं आव्हान ;


 लॉन्च केलं स्वत:चं अ‍ॅप स्टोअर....


पुणे :- ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणाऱ्या पेटीएमने गुगलला टक्कर देण्यासाठी थेट स्वत:चे अ‍ॅण्ड्रॉइड मिनी अ‍ॅप स्टोअर सुरु केले आहे. 


भारतीय अ‍ॅप डेव्हलपर्ससाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत पेटीएमने थेट गुगलला आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय. 


हे मिनी अ‍ॅप्स हे सामान्य अ‍ॅप्सप्रमाणे नसतील. 


हे अ‍ॅप्स वेब बेस अ‍ॅप्स असतील. 


म्हणजे या अ‍ॅपवर गेल्यावर तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर गेल्यासारखंच वाटेल. 


या अ‍ॅप्सच्या मदतीने युझर्सला त्यांचा डेटा आणि मेमरीही वाचवता येईल असा दावा पेटीएमने केला आहे. 


या अ‍ॅपमध्ये पेमेंट करण्याच्या पर्यायांमध्ये पेटीएम वॉलेट, पेटीएम पेमेंट बँक आणि शून्य टक्के शुल्क आकारणीवर यु.पी.आय. पेमेंटचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 


मात्र या माध्यमातून क्रेडिट तसेच डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगने पेमेंट करताना कंपनी दोन टक्के अतिरिक्त शुल्क आणि जी.एस.टी. आकारणार आहे. 


काही आठवड्यांपूर्वी गुगलने नियमांचे उल्लंघन करत असल्याचे कारण देत पेटीएम आपल्या प्ले स्टोअर या प्लॅटफॉर्मवरुन हटवले होते. 


“आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही.


 एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,


” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं. 


गुगलच्या नव्या नियमांवर झोमॅटो आणि स्वीगीसारख्या कंपन्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.