भय इथले संपत आहे! बाधितांचा गृहविलगीकरणाकडे अधिक कल;  रुग्णालयांतील निम्म्याहून अधिक खाटा रिक्त..... ( अनिकेत साठे, लोकसत्ता),

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 नाशिक : पहिल्या दोन ते तीन महिन्यांत करोनाचा अहवाल सकारात्मक आला की, रुग्ण लगेच महापालिका किंवा खासगी रुग्णालयात दाखल होत असत. करोनाविषयी इतकी भीती होती, की डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार व्हावेत, असेच प्रत्येकाला वाटायचे. 


या धास्तीमुळे करोनाचा कहर सुरू असताना गंभीर रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळणे जिकिरीचे ठरले होते. 


कालांतराने भीती कमी होऊ लागली. 


लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे असणारे घरीच उपचार घेऊ लागले. 


सध्या करोनाबाधितांचा आकडा साडेतीन हजारवर आला आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे, त्यातील निम्मे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. 


यामुळे महापालिका, खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढत आहे.


 आजाराबद्दलची भीती कमी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीअंशी कमी झाला आहे. 


एप्रिलच्या प्रारंभी शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. 


सुरुवातीच्या काळात प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती मोठी होती.


 प्रतिबंधित क्षेत्रात रहिवाशांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध होता. 


करोनाच्या धास्तीमुळे गरज नसताना नागरिकदेखील बाहेर पडत नव्हते. 


नंतर मात्र प्रादुर्भाव जसा वाढत गेला, तसे नियमदेखील बदलले. 


शहरातील बहुतांश भाग करोनाच्या सावटाखाली आले. 


झोपडपट्टी तसेच दाट लोकवस्तीतून करेानाने नंतर इमारती, बंगले अशा कॉलनी परिसरात ठिय्या दिला. 


दररोज एक ते दीड हजार नवीन रुग्ण आढळत होते. 


या काळात प्रतिबंधित क्षेत्राचा आकार कमी झाला. 


र्निबध शिथिलीकरणाच्या दिशेने पावले टाकली गेली.


 ही प्रकिया टप्प्याटप्प्याने प्रगतिपथावर असली तरी संसर्गाचा धोका आजही टळलेला नाही.


 त्यामुळे करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्वच स्तरांतून केले जात आहे.