भारताचे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री कालकथीत राम विलासजी पासवान यांची श्रद्धांजली सभा संपन्न*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल दलित सेना, महाराष्ट्र 


*भारताचे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री कालकथीत राम विलासजी पासवान यांची श्रद्धांजली सभा संपन्न*


दलित सेना पुणे शहर जिल्हा कमिटी यांच्या वतीने आज ताडीवाला रोड येथील नंदादीप हॉटेल च्या हॉल मध्ये सोशल डिस्टनन्स चे पालन करून आज सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले या सभेच्या अध्यक्ष स्थानी वंचित बहुजन आघाडीचे अर्थात भारिप चे जेष्ठ नेते आयु. वसंतराव साळवे हे होते सभेच्या वेळी दलित सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सुर्यमणी जी भिगवडे, जेष्ठ समाजवादी नेते प्रा. विकास देशपांडे, महाराष्ट्र प्रदेश दलित सेने चे प्रदेश आध्यक्ष सुनील दादा यादव, जेष्ठ विधितज्ञ अँड. मोहन वाडेकर जी, आर पी आय चे निलेशवजी आल्हाट, पुणे शहर आर पी आय युवक आघाडी चे शहर अध्यक्ष शैलेंद्र भाऊ चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु जाती विभाग उपाध्यक्ष सुजित अप्पा यादव, अँड जाकीर अत्तार, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल दादा तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जनार्दन जगताप, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत शेलार, दलित सेने चे जेष्ठ नेते वसंत राव बोले, प्रा मिहीर थत्ते, सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप, गौतम सावणे व दलित सेनेचे विविध जिल्हा अध्यक्षांनी या वेळी स्वर्गीय रामविलास पासवान याना आपल्या आठवणीने त्यांनी केलेल्या कार्यावर उजाळा टाकून श्रद्धांजली वाहिली सदर कार्यक्रमाचे आयोजन दलित सेनेचे शहर अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, पिंपरी चिंचवड दलित सेने चे अध्यक्ष शशिकांत कांबळे,दलित सेनेच्या महिला आघाडी प्रमुख आरती ताई जमदाडे, युवा नेते अविनाश भाऊ मोरे, मुष्ठीयोद्धा अमोल सोनवणे 


,मिलिंद कांबळे मांजरी चे माजी सरपंच शिलवंत कांबळे , सुर्यकांत जगताप, यांनी केले होते कार्यक्रमाच्या अगोदर बोधाचार्य संजय शिंदे व बंडू सर गायकवाड यांनी बौद्ध वंदना घेतली त्या अगोदर दिवंगत रामविलास जी पासवान यांच्या स्मृतीस सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले