सोन्यापेक्षा चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग ! अधिक मासात शंभर किलो चांदीची विक्री...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल  नागपूर : करोनामुळे बाजारपेठात आलेली मरगळ आता दूर होत असून बाजारात पुन्हा चैतन्य परतत आहे. सध्या अधिक मास असल्याने सराफा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून सोन्यापेक्षा चांदीच्या वस्तूंना जास्त मागणी आहे. जवळपास शंभर किलो चांदीच्या खरेदीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. सध्या सोन्याचे भाव ५२ हजार प्रति दहा ग्रॅमवर गेले आहे. तर चांदीचा दर ६३ हजार प्रतिकिलो आहे. सध्या सोन्याच्या खरेदीपेक्षा चांदीच्या खरेदीवर ग्राहकांच्या उडय़ा पडत आहे. अधिक मासात जावयांसाठी चांदीचे भांडे, देवपाट आदी वस्तू देण्याची प्रथा असल्याने सराफा बाजारात चांदी खेरदी वाढली आहे. टाळेबंदी काळात प्रतिष्ठाने तीन महिने बंद होती. त्यानंतर शिथिलता मिळाली असली तरी ग्राहकांनी बाजारपेठांकडे पाठ फिरवली होती. मात्र आता शहरात करोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने नागपूरकर घराबाहेर पडू लागले आहेत. परिणामी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे. सोन्याची मागणी ही नवरात्रीपासून सुरू होते. त्यामुळे व्यापारी नवरात्रीची वाट बघत आहेत. सध्या ते चांदीच्या विविध वस्तू विक्रीत व्यस्त आहेत. अधिक मासात जवळपास शंभर किलो चांदीची विक्री होत असल्याने उलाढालही वाढत आहे. तर पुढे नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण असल्याने व्यापाऱ्यांनी घाऊक बाजारपेठत सोन्या-चांदीची पूर्व नोंदणी केली आहे. तर कारागीरही विविध दागिने तयार करण्यात व्यस्त झाले आहेत. यंदा दसरा व दिवाळीची खरेदी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. सोन्याचे भाव अधिक वाढण्याची शक्यता महाराष्ट्र सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले.


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान