आय.पी.एल.(I.P.L.) 2020 :स्टोक्सचे आगमन राजस्थानसाठी यशदायी ?

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


आय.पी.एल.(I.P.L.) 2020 :स्टोक्सचे आगमन राजस्थानसाठी यशदायी ?


दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आय.पी.एल.) यंदाच्या हंगामाचा धडाक्यात प्रारंभ केल्यानंतर सलग चार पराभव पत्करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला बेन स्टोक्सचे आगमन यशदायी ठरेल अशी आशा आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात पराभवाची मालिका खंडित करण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. सहा सामन्यांपैकी दोन विजय आणि चार पराभवांमुळे राजस्थानचा संघ ‘आय.पी.एल.’च्या गुणतालिके त तळापासून दुसऱ्या स्थानावर आहे, तर हैदराबादने सहापैकी तीन सामने जिंकले आहेत. शनिवारी विलगीकरण संपवणाऱ्या स्टोक्सची राजस्थान प्रतीक्षा करीत आहे. पहिल्या हंगामाचे विजेते ठरलेल्या राजस्थानला स्टोक्सच्या अनुपस्थितीत योग्य सांघिक समतोल साधता आलेला नाही. ’सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.