आय.पी.एल.(I.P.L.) 2020 :  मुंबई-दिल्लीमध्ये आज चढाओढ...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आय.पी.एल.(I.P.L.) 2020 : 


मुंबई-दिल्लीमध्ये आज चढाओढ....


अबू धाबी : ‘आय.पी.एल.’च्या दुसऱ्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गुणतालिकेत अग्रस्थानी असलेला दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना चुरशीच्या लढतीची अपेक्षा असून दिल्लीला नमवून मुंबई पहिल्या क्रमांकावर येणार का ? हे पाहणे रंजक ठरेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ यंदा स्वप्नवत कामगिरी करत असून मार्कस स्टोइनिस सातत्याने अष्टपैलू योगदान देत आहे. परंतु जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सनच्या वेगवान माऱ्यापुढे दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यास मुंबईला पाचव्या विजयापासून रोखणे कठीण आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी आतापर्यंत एकाही संघाला धावांचा यशस्वी पाठलाग करू दिलेला नाही. ’ सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट