राज्यात भा.ज.पा. स्वबळावर सत्तेत येईल – जे. पी. नड्डा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 पुढील काळात भा.ज.पा. स्वबळावर सत्तेत येईल, असा आत्मविश्वास भा.ज.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष कायमच विरोधी पक्षात राहतील, असे स्पष्ट करीत नड्डा यांनी भा.ज.पा. कोणत्याही पक्षाशी राज्यात युती करणार नाही, असे संकेत दिले. 


भा.ज.पा.च्या नवनियुक्त प्रदेश कार्य समिती व पदाधिकारी बैठकीत बोलताना नड्डा यांनी भा.ज.पा. व अन्य पक्षांमधील कामकाज पद्धतीतील फरक विशद केला. 


भा.ज.पा.मध्ये वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असलेल्यांना पदे मिळत नाहीत, त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन करून मिळतात, असे सांगितले. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने काहीच केले नाही. पण पंतप्रधान मोदी यांनी धैर्य दाखवून निर्णय घेतले आणि शेतकऱ्यांना निर्बंधांमधून मुक्त केले, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.