पुण्यात घरगुती वादातून आजारी व्यक्तीला जिवंत जाळलं

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


धक्कादायक! 


पुण्यात घरगुती वादातून आजारी व्यक्तीला जिवंत जाळलं.....


पुणे :- जिल्ह्यातील तळेगावमध्ये एका ५५ वर्षीय आजारी व्यक्तीला गंभीर जखमी करून जिवंत जाळून खून केल्याची घटना घडली आहे. 


ही घटना पहाटेच्या सुमारास तळेगावमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी नारायणसिंग विजयसिंग झवेरी (वय- २५ रा. तळेगाव) याला अटक करण्यात आली असून विजय भगवान झवेरी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत आणि आरोपी हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. अवघ्या एका तासाच्या आत तळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या तळेगाव येथे पहाटेच्या सुमारा एका व्यक्तीला जिवंत जाळून खून केला आहे. मयत विजय झवेरी हे त्यांच्या घरात झोपले होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असून घरात त्यांची पत्नी आणि आणखी एक महिला घरात झोपल्या असताना पहाटेच्या सुमारास आरोपी नारायणसिंग याने दरवाजा ठोठावला. गोंधळ घालत मला घरात घ्या अन्यथा तुम्हा दोघांना मारतो अशी दमदाटी केली. दरवाजा उघडताच मयत यांच्या पत्नीला आरोपीला धक्काबुक्की केल्याने त्या घाबरून घराबाहेर गेल्या. दरम्यान, आरोपी यांनी घराच्या आतून कडी लावून मयत विजय झवेरी यांना काठीने त्यानंतर दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि गोधडीसह त्यांना जिवंत पेटवून दिले आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी जावून आग विझवली. तर, आरोपीला देखील एका तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे.