आजपासून निम्म्या दरात मेट्रो धावणार ;मुखपट्टय़ा ( मास्क )बंधनकारक, सामाजिक अंतरावरही लक्ष;

पुणे प्रवाह न्युज पोर्टल  प्रथम हिंगणा मार्गावर, 


रविवारपासून वर्धा मार्गावर सेवा.....


 नागपूर : करोना संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेली नागपूर मेट्रोची सेवा सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर शुक्रवारी सकाळी आठ वाजतापासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी बर्डी ते हिंगणा (लोकमान्यनगर) या मार्गावर तर रविवारपासून बर्डी ते खापरी दरम्यान वर्धा मार्गावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. 


विशेष म्हणजे, मेट्रोने सर्वच टप्प्यातील तिकीट दर निम्मे केले आहेत. 


त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी या सेवेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे.


 मेट्रो प्रवासादरम्यान प्रवाशांना मुखपट्टय़ा ( मास्क )बांधणे बंधनकारक आहे. 


स्थानकांवर आणि प्रवासादरम्यानही प्रवाशांना सामाजिक अंतर पाळावे लागेल. 


त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक डब्ब्यात सुरक्षा रक्षक ठेवण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे. 


मेट्रोचे सर्व कर्मचारी हातमोजे आणि इतर आवश्यक ती काळजी घेऊनच प्रवाशांना सेवा देणार आहेत. 


 प्रत्येक फेरीनंतर डब्यामधील आसन, लोखंडी बार आणि हॅन्डल्स सॅनिटायझरद्वारे पुसले जातील. 


प्रवाशांची तापमान तपासणी केली जाईल.


 शिवाय त्यांनाही सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची विनंती केली जाईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. 


करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मेट्रोसेवा स्थगित करण्यात आली होती. 


त्यानंतर बुधवारी राज्य शासनाने गुरुवारपासून मेट्रो सुरू करा,असे आदेश दिले. मात्र महामेट्रोकडे केंद्राने ठरवून दिलेली मानक कार्यपद्धती (एस.ओ.पी.)आली नव्हती. 


गुरुवारी ती प्राप्त झाल्यावर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
आय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
मा. श्री. गौतम जैन सामाजिक कार्यकर्ते यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image