कर्जत नगरपरिषद कडून सुवर्ण कन्या उपक्रमातील सहभागासाठी आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल कर्जत,ता.16 गणेश पवार


                      कर्जत नगरपरिषद कडून महिलांचे सक्षमीकरण करतानाच नवजात कन्या रत्नाच्या नावे सुवर्ण कन्या योजना हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.कर्जत नगरपरिषद हद्दीतील या योजनेत पात्र ठरलेल्या पहिल्या लाभार्थी ठरलेल्या सिद्धी सचिन वारंगे यांचा पालिकेने विशेष सत्कार केला.


              कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. सुवर्णा केतन जोशी यांच्या संकल्पनेतून कर्जत नगरपरिषददेच्या महिला बालकल्याण विभागाकडून सुवर्ण कन्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमध्ये समावेश असलेल्या गरोदर मातेने कन्यारत्नला जन्म दिल्यानंतर त्या मातेच्या उपचारासाठी आणि पौष्टिक आहारासाठी नगरपरिषदेच्या वतीने पाच हजाराची मदत देण्याची ही योजना आहे.त्या गरोदर महिलेचे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावर ही रक्कम तात्काळ वर्ग करून त्या मातेला आधार देण्याचा निर्णय कर्जत नगरपरिषद कडून घेण्यात आला आहे.सदर योजनेचा लाभ एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभाकरिता दारिद्य्र रेषेखालील गरोदर माता यांनी लाभार्थ्यां म्हणून अर्ज करायचा असून सोबत रहिवासी दाखला तसेच जन्म झालेल्या मुलीचा जन्म दाखला,आपली शिधा पत्रिका, दारिद्र्यरेषेखालील दाखला आणि आधार लिंक असलेला बँकेचा पासबुकची छायांकित प्रत जोडणे आवशयक आहे.


                   कर्जत नगरपरिषदेच्या या आगळ्यावेगळ्या योजनेमधील पहिले पात्र ठरलेल्या लाभार्थी सौ. सिद्धी सचिन वारंगे यांना कर्जत नगरपरिषद मध्ये सन्मान करण्यात आला.त्यावेळी या योजनेची संकल्पना असलेल्या कर्जतच्या नगराध्यक्ष सौ. सुवर्णा जोशी यांच्यासह पालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, महिला बालकल्याण सभापती प्राची डेरवणकर, पाणी सभापती बळवंत घुमरे,बांधकाम सभापती विवेक दांडेकर तसेच पालिकेचे नगरसेवक सोमनाथ ठोंबरे,राहुल डाळिंबकर, नगरसेविका संचीता पाटील,पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील आदी उपस्थित होते.याप्रसंगी नगर परिषदेचे कर्मचारी अरविंद नातू ,सुदाम म्हसे, अविनाश पवार, रवी लाड ,सारिका कुंभार ,कल्याणी लोखंडे ,ऋषिता शिंदे यांचे सहकार्य ही योजना राबविताना पालिकेकडून होत आहे.दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला या माध्यमातून बाळंतपण नंतर मोठा आधार मिळाला असून या योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


फोटो ओळ 


कर्जत नगरपरिषद सुवर्ण कन्या योजना