संग्राम शेवाळे यांनी घेतली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा.उदयजी सामंत यांची भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे:-कोरोनाच्या काळात राज्यातील विद्यार्थी यांचे प्रमुख प्रश्न आणि मुख्य अडचणी दूर होण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी हितकारक अभियान राबवले होते.आजही तो लढा आणि पाठपुरावा चालू आहे.मागील काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकरी बांधव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जनता दल (से) विद्यार्थी संघटना नेहमी शेतकरी यांच्या मुलांसाठी प्रामाणिक काम करत आली आहे.त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदयजी सामंत साहेब यांची भेट घेऊन चालू स्थितीमध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाची परस्थिती समजून सांगून शैक्षणिक फी, परीक्षा फी, हॉस्टेल फी, आणि मुख्यतः शेतकरी बांधव यांची मुले विद्यार्थी आहेत त्यांच्याबाबतीत वेगळा निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा.हे निर्णय होणे गरजेचे आहे हे मंत्री महोदय यांना जाणीवपूर्वक सांगितले मंत्री महोदय यांनी यावर सकारत्मक चर्चा केली. जोपर्यंत या मागण्यांना यश येत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेऊन पाठपुरावा करणार आहे.ही आमची स्पष्ठ भूमिका आहे.अतिवृष्टी झाल्यावर सर्व माहिती घेऊन विद्यार्थी हितासाठी शिक्षणमंत्री महोदयांना भेटणारे संग्राम शेवाळे पाहिले विद्यार्थी प्रतिनिधी आहेत.शेवाळे यांनी ताबडतोब दखल घेतल्याने विद्यार्थी वर्गात एक आनंदाचे वातावरण आहे.


असे संग्राम शेवाळे यांनी आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image