बेभान झालेल्या नशेत झिंगाट असलेल्या एका सचिवाने व्हाॅटशाँफ ग्रुपवर केलेल्या आरोपींची उच्च स्तरीय चौकशी होणार का??? आणि संबंधितांना वर कारवाई कोण करणार???

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


बेभान झालेल्या नशेत झिंगाट असलेल्या एका सचिवाने व्हाॅटशाँफ ग्रुपवर केलेल्या आरोपींची उच्च स्तरीय चौकशी होणार का???


आणि संबंधितांना वर कारवाई कोण करणार???


 *


*मुंबई :-* या सचिवांवर तातडीने कारवाई करून त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. मात्र हे आयएएस, आयपीएस अधिकारी पदांवर असताना अनेकदा बेतालपणा करतात, त्याचा फटका त्यांच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांना बसतो तेव्हा त्यांना कोणीच वाली नसतो.


राज्याच्या ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्याकडील पदभार काढून घेऊन पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे अपर सचिव संजय चहांदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मंत्रालयातल्या सचिवस्तरीय अधिकऱ्यांच्या वाटसॲप ग्रुपवरील बेताल आणि बेभान आरोपांच्या पोस्टमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात आयएएस अधिकाऱ्यांचे दोन प्रमुख वाटसॲप ग्रुप आहेत. त्यात एका समूहावर राज्यातील सचिव दर्जाचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि दुसऱ्या ग्रुपवर जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले तरुण आयएएस अधिकारी आहेत. यातील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर राज्याच्या ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कुमार यांनी रविवारी रात्री बराच गोंधळ घातला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्याच केडरच्या अत्यंत वरिष्ठ अशा सहकाऱ्यांवर बरीच मुक्ताफळे उधळली.


राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्य मंत्र्यांचे विद्यमान सल्लागार असलेले अजोय मेहता आणि माजी मुख्य सचिव तथा विद्यमान लोकपाल डी के जैन यांच्यावर भरपूर तोंडसुख घेतले. अत्यंत खालच्या स्तरावर जावून बेताल वक्तव्य करत आणि असभ्य भाषेत रविवारी रात्रीच्या मध्यापासून सुरू झालेला हा प्रकार सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. अरविंदकुमारांनी बेफाम आणि बेभान होऊन अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. त्यात मुंबईचे माजी आयुक्त प्रवीण सिंह परदेशी आणि माजी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनाही सोडले नाही.


पत्रकारांनी झाल्या प्रकाराबद्दल अरविंदकुमार यांना विचारणा केली असता अतिउत्साहात ग्रुपवर हे सर्व लिहिले गेले असल्याचे त्यांनी संगितले. त्यावर आपण आपल्या सहकारी अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केलेल आहेत आणि यासाठी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे असे विचारले असता, ही सर्व गंमत होती असे उत्तर दिले.


उद्योजकांना मदत करुन मुख्य सचिव पद मिळविल्याच्या अरविंद कुमार यांच्या आरोपाला डी के जैन यांनी गंभीर घेतले असून मंगळवारी सायंकाळी मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे रितसर लेखी तक्रार करून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्य वरिष्ठ अधिकारी यांनीही मुख्य सचिवांकडे मौखिक तक्रारी नोंदवल्या आहेत.


अरविंदकुमार 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून राज्याच्या ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य सचिव त्यांना रिपोर्टिंग करत असतात.


अरविंद कुमार यांनी जे आरोप आणि शाब्दिक हल्ले केले त्याच्या पोस्ट त्यांनी वर उल्लेख केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या दोन्ही समूहावर टकल्या. सर्व प्रकार विकोपाला जातोय हे लक्षात आल्यावर मध्यरात्री नंतर अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) शमनोज सौनिक यांनी अरविंदकुमार यांना वाटसॲप ग्रुपवरून काढून टाकले.


अरविंदकुमार यांनी परदेशी यांच्या काही स्विस बँक खात्याबाबतही उल्लेख केला. बांद्रा ड्राइव्ह खाजगी पार्टीला दिल्या बाबतही प्रश्न उपस्थित केले. एवढेच नाही तर मेहता यांना मुख्य सचिवपदी मुदत वाढ कशा मिळाल्या यावरही प्रश्न उपस्थित केले.


मी पात्र ठरत असतानाही मला योग्यपद मिळू नसल्याचा आरोप अरविंदकुमार यांनी प्रवीण सिंह परदेशी यांच्यावर लावला. तर स्वाधीन क्षत्रीय यांनी देखील स्पर्धक म्हणुन मला डावलल्याचा आरोप करतानाच प्रत्येकाचे कारनामे उघड केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिली.


अरविंदकुमार यांनी वाटसॲप ग्रुपवर केलेल्या चर्चेची पडताळणी केलेली आहे. जैन यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून सदर प्रकरण मुख्यमंत्र्यांपुढे ठेवले असून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले आहे.


अरविंद कुमार यांना 2007 साली निलंबित करण्यात आलेले होते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत निरिक्षक म्हणून काम करताना त्यांनी बीएसएफच्या जवानाची रायफल हिसकावून घेतली होती.


ग्रामविकास विभागातील उमेद अभियानांतर्गत चालणारे काम एका कंपनीला देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 3500 तरुण-तरुणींना एक आदेश काढून अरविंद कुमार यांनी बेरोजगार केले आहे. त्याचबरोबर ग्रामविकास विभागात अनेक प्रताप त्यांनी केले आहेत. या सर्वांची चौकशी करून योग्य ते बदल केले जावेत अशी मागणी करण्यात येत आहे.