तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे

पुणे प्रवाह न्युज पोर्टलपुणे :- महाराष्ट्रात कोवीड महामारीने सर्वांचेच नुकसान झाले आहे.त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशा परिस्थितित तरुणांनी डगमगून न जाता राज्यशासन व केंद्र शासन यांच्या विविध योजनांचा लाभ घेवून उद्योजक बनावे.सध्या उद्योगांना पोषक अशी परिस्थिति आहे. असे प्रतिपादन पी.टी.काळे(कार्याध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी महासभा उद्योग आघाडी) यांनी हडपसर येथील मार्गदर्शक कार्यक्रमात केले आहे.पी.टी काळे स्वत: गेली ३० वर्ष शिबिरे घेवून या बाबत मार्गदर्शन करीत आहेत आजवर त्यांनी अनेक उद्योजक तयार केले आहेत.उद्योग उभारणीसाठी लागणार्‍या प्रकल्प अहवाल,मशीनरी माहिती व पुरवठा,उत्पादन प्रक्रिया व बँकिंग संबंधी सविस्तर माहिती देत आहेत.शेतीमाल प्रक्रिया उद्योग,शेतकरी उत्पादक कंपनी या सर्व माहिती करिता संपर्क ptkale&company.com   


छायाचित्र : पी टी काळे.