पुणे विभागातील 4 लाख 44 हजार 475 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी         विभागात कोरोना बाधित 4 लाख 88 हजार 768 रुग्ण ....विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



  पुणे,दि.21 :- पुणे विभागातील 4 लाख 44 हजार 475 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 88 हजार 768 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 873 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 420 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हा


  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 15 हजार 756 रुग्णांपैकी 2 लाख 90 हजार 823 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 17 हजार 517 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.10 टक्के आहे. 


सातारा जिल्हा


   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 865 रुग्णांपैकी 37 हजार 405 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 11 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


सोलापूर जिल्हा


    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 433 रुग्णांपैकी 33 हजार 128 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 946 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 359 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


  सांगली जिल्हा


               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 236 रुग्णांपैकी 39 हजार 207 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 440 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा


  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 478 रुग्णांपैकी 43 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 959 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 607 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 292 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 745, सातारा जिल्ह्यात 209, सोलापूर जिल्ह्यात 124, सांगली जिल्ह्यात 163 तर कोल्हापूर जिल्ह्यात 51 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण -  


पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 823 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 895 ,सातारा जिल्हयामध्ये 97, सोलापूर जिल्हयामध्ये 373, सांगली जिल्हयामध्ये 305 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 153 अशा रुग्णांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 41 हजार 505 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 88 हजार 768 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 


( टिप :- दि. 20 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


                         *****