खांडस ग्रामपंचायत उपसरपंचपदी रेखा मेंगाळ कर्जत,ता.27 गणेश पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल              कर्जत तालुक्यातील खांडस ग्रुप ग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदी आदिवासी विकास आघाडीच्या रेखा मेंगाळ यांची निवड करण्यात आली आहे.तुकाराम हिंदोळा आणि रेखा मेंगाळ यांना प्रत्येकी सहा-सहा मते मिळाल्याने अद्यासी अधिकारी आणि सरपंच मंगल ऐनकर यांनी आपले मत मेंगाळ यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांना सात मते मिळवून त्या उपसरपंच पदावर विराजमान झाल्या. 


                तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या खांडस ग्रुपग्रामपंचायतमध्ये उपसरपंच रिक्त झाले होते.त्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडणूक थेट सरपंच मंगल ऐनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.उपसरपंच पदासाठी निर्धारित वेळेत तुकाराम हिंदोळा आणि रेखा मेंगाळ यांनी अर्ज दाखल केला होता.विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य मनिषा माळी,पुष्पा राम ऐनकर,सुवर्णा सुरेश ऐनकर,अंकुश ऐनकर,केरूनाथ बांगारे,तुकाराम हिंदोळा,भरत खडके,जिजाबाई मेंगाळ,तुळसीबाई पादीर,अनंत जगदाडे,हे सदस्य उपस्थित होते.निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात उपसरपंच पदांचे उमेदवार तुकाराम हिंदोळा आणि रेखा शंकर मेंगाळ यांना प्रत्येकी सहा मते मिळाली.दोन्ही उमेदवार यांना समान मते मिळाल्याने शेवटी अद्यासी अधिकारी सरपंच मंगल ऐनकर यांनी आपले मत देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रेखा मेंगाळ यांना आपले मत दिल्याने त्यांची एकूण मते सात झाली आणि त्यांची उपसरपंच पदी निवड झाली. झालेचे सभेच्या अध्यक्षांने घोषित केले. सरपंच मंगळ जयवंत ऐनकर व निवडणूकीची सर्व प्रक्रिया ग्रामविस्तार अधिकारी यांनी पार पाडली,तर सर्व प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी नेरळ पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक केतन सांगळे आणि पोलीस कर्मचारी सहकारी उपस्थित होते. 


               यावेळी जेष्ठ नेते जनाबुवा ऐनकर,बाळूशेठ ऐनकर, संतोष पाटील (अध्यक्ष कळंब पंचायत समिती),माजी सरपंच विलास माळी, तसेच रामदास हरी ऐनकर,भाऊ ऐनकर,भास्कर माळी,गोपीनाथ भोईर,देवीदास ऐनकर,सदानंद भाऊ ऐनकर,दत्तू पादीर,धोंडू बांगारे ,शंकर मेंगाळ,राजाराम ऐनकर,जनार्दन बांगारे,शिवनाथ ऐनकर,अरुण ऐनकर,सुरेश गणपत ऐनकर,मंगळ माळी,हरीश ऐनकर,राजाभाऊ ऐनकर,हरी पादीर,विपुल माळी, किसन ऐनकर अदी ग्रामस्थ उपस्थित होते. 


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image