राज्यातील एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधीत 16 नोव्हेंबर 2020 ऐवजी 17 नोव्हेंबर 2020 असा बदल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



*राज्यातील एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधीत 16 नोव्हेंबर 2020 ऐवजी 17 नोव्हेंबर 2020 असा बदल*


  पुणे, दि. 27: भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशाच्या अनुषंगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर 2020 असा होता. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार राज्यातील एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधीत 16 नोव्हेंबर 2020 ऐवजी दिनांक 17 नोव्हेंबर 2020 असा बदल करण्यात आल्याचे माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी पत्रकान्वये कळविले आहे.