सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 12 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होत आहेत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांसंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन


 


पुणे , दिनांक १० ऑक्टोबर २०२० : 


. तीनही जिल्हे मिळून सुमारे 2 लाख 50 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. चारही विद्याशाखा मिळून सुमारे 3300 विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रथमच मोठया प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा आयोजित केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थीहित हेच ध्येय केंद्रस्थानी ठेवून सर्व व्यवस्था निर्माण केल्या आहेत. एवढया मोठया प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून अंतिम वर्षाची परीक्षा आयोजित करणारे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील आपले एकमेव विद्यापीठ आहे. 


तांत्रिक कारणामुळे परीक्षेत व्यत्यय आला किंवा अन्य अडचणी निर्माण झाल्या तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये. परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाईल. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे. विद्यार्थी व पालक यांनी विद्यापीठास या कामी सहकार्य करावे, ही विनंती. सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !!!


- प्रा. (डॉ.) नितीन करमळकर


कुलगुरू,


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ