विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात , मार्चनंतर सोलापूरातून धावणार विजेवरील रेल्वे...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात ,


मार्चनंतर सोलापूरातून धावणार विजेवरील रेल्वे....


सोलापूर : लॉकडाऊनमधील प्रवासी गाड्या बंदचा फायदा घेत रेल विकास निगम कंपनीने हाती घेतलेले मध्य रेल्वे विभागातील दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने पूर्ण होत आहे़ ३४० किलोमीटरपैकी १०९ किमी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित २३१ किमीचे काम प्रगतिपथावर असून, तेही मार्च २०२१ अखेर पूर्ण होणार आहे़ मार्चनंतर सोलापूर विभागातून विजेवरील रेल्वे गाड्या धावण्यास सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात २०१२ साली सुरू करण्यात आलेले  दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ याशिवाय दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचे काम सुरू झाले़ सद्यस्थितीला दौंड ते सोलापूर व सोलापूर ते वाडीपर्यंत दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, वाडी ते सावळगी या ५० किलोमीटर व दौंड ते वाशिंबे या ५९ किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले़ त्यामुळे दौंड ते वाशिंबे या मार्गावर विजेवरील रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली अन् ती यशस्वी झाली़ आता वाडी ते सावळगी व सावळगी ते दुधनीपर्यंतच्या झालेल्या कामावरील चाचणी येत्या काही दिवसात होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वेमार्ग पूर्वी एकेरी होता, त्यानंतर दुहेरीकरणाची मागणी झाली. २०१२ साली दुहेरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली़ नऊ वर्षांनंतर दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आहे़ संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर सोलापूर विभागातून धावणार्या सर्वच गाड्या या विजेवर धावणार आहेत़ त्यामुळे नक्कीच या गाड्यांचा वेग वाढणार असून, गाड्यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याची माहिती रेल्वे अधिका-यांनी दिली.