कोरोना साथ रोगाचे पार्श्वभूमीवर विद्यापीठ परीक्षांबाबत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*#कृपया प्रसिद्धीसाठी...*


 


दिनांक:- १६ सप्टेंबर, २०२०


प्रति,


 मा.ना. उदयजी सामंत,


मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग,


 मंत्रालय, मुंबई .


 विषय :


 महोदय ,  


         उपरोक्त विषयी माझ्या निदर्शनास आले आहे की ,स्थगीत केलेल्या विद्यापीठ परीक्षा घेताना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत . पारंपारिक रित्या विद्यार्थ्यांना वर्णनात्मक उत्तरे लिहिणे सवयीचे आहे. अशा परिस्थितीत नव्याने बहुपर्यायी प्रश्नपत्रिका परीक्षेत आल्यास विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.तसेच ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन ची परवानगी दिलेली आहे . तथापि यात ऑनलाइन पेपर आधी माहीत झाल्याने आँफलाईन परिक्षार्थींना प्रश्न आधीच माहिती पडण्याची शक्यता जाणवते .


ऑनलाइन परीक्षा देताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. करिता आपणास विनंती करण्यात येते की याबाबतीत पुनर्विचार व्हावा.


         तसेच माझ्या असेही निदर्शनास आले आहे की *राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये होत असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करण्यात येत नाही. कृपया आपल्या स्तरावर कुलगुरूंना याबाबत सुचित करावे ही विनंती*


                 तसेच विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांनी अधिक जोमाने कार्यरत होऊन कोरोना साथ रोगाचे काळात विद्यार्थी नाऊमेद होणार नाहीत ,याची काळजी आपण ऊत्तमप्रकारे घेत आहात परंतू राज्यात विविध विद्यापीठे स्वायत्ततेच्या आधारे कोणताही संवाद, विचारविनीमय न करता विविध घोषणा व परीक्षाविषयक नियम व निकष घोषित करत आहेत.त्यात काही प्रमाणात सुसूत्रीकरण व मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर विचार करुन आराखडे देण्यास सर्व विद्यापीठांना सुचवावे.विद्यापीठांच्या अशा मनमानीचा विद्यार्थ्यांवर प्रतिकुल परिणाम होत असुन विद्यार्थी व पालकांचे मनोबल खच्ची होत आहे.म्हणुन परीक्षांचे सुसूत्रीकरण आपल्या विभागाने करावे असे मी आपणास निर्देशीत करत आहे.


आपली विश्वासू 


   


ना.डॉ नीलम गोर्हे


उपसभापती-महाराष्ट्र विधानपरिषद