कमवा व शिका' योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना*  *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


*'


  पुणे दि.18:- पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.


  विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, समाज कल्याण विभागाचे सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार तसेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.


  गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांसाठी प्रशासकीय कामाचा अनुभव आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मासिक वेतनही देण्यात येणार आहे.


 


*अखिल भारतीय वारकरी मंडळ हवेली तालुका कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश प्रदान*


 


  पुणे जिल्हयातील अखिल भारतीय वारकरी मंडळ, हवेली तालुका कमिटीच्या वतीने 1 लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड 19 साठी सुपूर्द करण्यात आला यावेळी मंडळाचे तालुका अध्यक्ष संतोष महाराज काळोखे देहूकर व अन्य पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते.


००००


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली