वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन- विभागीय आयुक्त सौरभ राव*


पुणे दि.8 : - वंदेभारत मिशनअंतर्गत सहाव्या टप्प्याची सुरुवात 1 सप्टेंबर 2020 पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये 31 ऑगस्ट 2020 अखेर पहिल्या ते पाचव्या टप्प्याअखेर एकूण 9 हजार 513 व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून ते 7 सप्टेंबर 2020 अखेर सहाव्या टप्प्यामध्ये 640 असे एकूण 10 हजार 221 परदेशातून व्यक्तींचे आगमन झालेले आहे. 


        यामध्ये पुणे जिल्हयातील 8 हजार 329 सातारा जिल्हयातील 598, सांगली जिल्हयातील 415, सोलापूर जिल्हयातील 400 तर कोल्हापूर जिल्हयातील 479 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.