आय.पी.एल. सामन्यावर सट्टा लावणारा अटकेत...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मुंबई : आय.पी.एल. सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मालाड परिसरातून अटक केली. संदीप मदनराज दोषी (४१) असे या बुकीचे नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यादरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर संदीप सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मालाड येथील मार्वे रस्त्यावरील गंगा सोसायटीतील सदनिकेवर छापा घालून संदीपला अटक केली. त्याच्याकडून एक मोबाइल फोन, बेटिंग आय.डी. आणि टी.व्ही. सेट पोलिसांनी जप्त केला आहे. संदीप हा ‘लोटस बुक २४७’, ‘ए.बी.ई.एक्स.सी.एच.’, ‘प्लेविन २४७’ या तीन अ‍ॅपच्या माध्यमातून सट्टा लावत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.