शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी,  व्हि.डी.ओ. व्हायरल झाल्यानंतर कारवाई....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, 


व्हि.डी.ओ. व्हायरल झाल्यानंतर कारवाई.....


मध्य प्रदेश:- विशेष पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेले पुरुषोत्तम शर्मा यांना राज्य सरकारनं तडकाफडकी पदावरून दूर केलं आहे. 


आय.पी.एस. अधिकारी असलेल्या पुरुषोत्तम शर्मा यांचा पत्नीला मारहाण करतानाच एक व्हि.डी.ओ. व्हायरल झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. वरिष्ठ आय.पी.एस. अधिकारी पुरुषोत्तम शर्मा याचं नाव एका व्हायरल झालेल्या व्हि.डी.ओ.नं चर्चेत आलं होतं. पुरुषोत्तम शर्मा सध्या मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेलं होतं. काही दिवसांपासून महासंचालकांचाच एक व्हि.डी.ओ. सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हि.डि.ओ.मध्ये शर्मा हे एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हि.डी.ओ.मधील महिलेला शर्मा बेदम मारहाण करताना जमिनीवर आपटतात आणि नंतर बुक्के मारतानाही दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हि.डि.ओ.मध्ये ज्या महिलेला मारहाण केली जात आहे ती शर्मा यांची पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हि.डी.ओ. व्हायरल झाल्यानंतर माध्यमांमध्ये पुरुषोत्तम शर्मा यांचं नावं चर्चेत आलं. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं त्यांनी विशेष पोलीस महासंचालक पदावरून दूर केलं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याची माहिती दिली.


आय.पी.एस. अधिकाऱ्याला पत्नीने प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं, पत्नीला घरी येऊन केली मारहाण केली