पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- मराठा आरक्षणासाठी गेले पंचवीस ते तीस वर्षे संविधानिक शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाने जगाला हेवा वाटावा असे क्रांती मोर्चे देखील संविधानाला धरूनच काढले. मागासवर्ग आयोगाने आरक्षणासाठी सर्व निकषांवर मराठा समाज पात्र असल्याची शिफारस करून देखील मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती देऊन मराठा समाजावर अन्याय केला या सगळ्या प्रक्रियेत मराठा समाजाचं काय चुकलं यासाठी संविधान प्रास्ताविकेचे वाचन व आत्मक्लेश आंदोलन शिवाजीमहाराज पुतळा शिवाजीनगर एस,एस,पीम एस कॉलेज पुणे येथे कोरोनाचे सगळे नियम पाळून मास्क वापरून करण्यात आले.