पुणे प्रवाह न्युज पोर्टल
विधानपरिषद नवनिर्वाचित ऊपसभापती ना.नीलम गोर्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व भारताचे माजी संरक्षण मंत्री श्री.शरदराव पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
मुंबई :- विधानपरिषद नवनिर्वाचित ऊपसभापती ना.नीलम गोर्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व भारताचे माजी संरक्षण मंत्री श्री.शरदराव पवार यांची सदिच्छा भेट घेतली.त्यावेळी मा.शरदराव पवार यांना 'विधानपरिषद व माझे कामकाज' हे ना.नीलम गोर्हे यांच्या विधीमंडळातील कामकाजाबाबतचे पुस्तक व श्री रामप्रभुजींच्या नावाचे महावस्त्र भेट दिले.
विधीमंडळाला राष्ट्रकुल महासंघाच्या कामात अधिक सक्रिय करण्याचा सल्ला नीलम गोर्हे यांना मा.शरदराव पवार यांनी दिला.
ऊपसभापती पदाच्या निवडणूकीत आघाडीच्या वतीने एकदिलाने कामकाज झाले व त्यात मा.पवार साहेबांनी मा.ना.ऊद्धवसाहेब ठाकरे ,ना,अजितराव पवार,तसेच का्ँग्रेस नेते यांच्या समवेत काटेकोर लक्ष घातले त्याबद्दल ना.नीलम गोर्हे यांनी त्याबद्दल आभार मानले .