स्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

पुणे प्रवाह न्युज पोर्टलमुंबई :- बॉम्बस्फोटामध्ये कीर्ती गमावणार का आई-वडिलांचं छत्र?


स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. कीर्तीवर तिच्या आई-बाबांचं जीवापाड प्रेम. लेकीने शिकून आयपीएस अधिकारी व्हावं आणि तिचं सुशिक्षित मुलाशी लग्न व्हावं ही स्वप्न आई बाबांनी पाहिली होती. मात्र त्यांची ही स्वप्न फक्त स्वप्नच राहणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कीर्तीचे आई बाबा कीर्तीला परीक्षा केंद्रावर सोडून खरेदीसाठी म्हणून मंडईत फिरत असताना अचानक बॉम्बस्फोट होतो. या बॉम्बस्फोटामध्ये त्यांना मोठी दुखापत होते. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. शुभम त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये नेतो खरा पण या दोघांचे प्राण वाचणार का हे मालिकेच्या पुढील भागामध्ये उलगडेल.


कीर्ती आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारा हा प्रसंग. या प्रसंगाचा सामना कीर्ती कशी करणार? कीर्तीच्या आई-बाबांचा जीव वाचणार का? याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त


स्टार प्रवाहा वर.


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान