सिकल सेल व्याधीचा त्रास सहन करणाऱ्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया... (प्रशांत देशमुख )

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सिकल सेल व्याधीचा त्रास सहन करणाऱ्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया...


(प्रशांत देशमुख )


वर्धा : करोना काळातील अति दक्षतेच्या पार्श्वभूमीवर मरणप्राय वेदना अनुभवणाऱ्या एका तरूण रूग्णावर जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात सावंगीच्या रूग्णालयातील शल्य चिकित्सकांना यश आले आहे.  सिकलसेल व्याधीने त्रस्त व त्यातच पोटदुखीच्या वेदना सहन करणाऱ्या कारंजा तालुक्यातील धीरज निकोसे याने आता सुटकेचा श्वाास घेतला आहे. या अठरा वर्षीय तरूणास पाच वर्षांपूर्वी बंगळुरु येथे पित्ताशयातील संसर्गावरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र येथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोनच वर्षात त्याच्या पित्ताशयाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे पालकांनी त्याला हैदराबादच्या नामांकित रूग्णालयात कोलेडोकोलिथोटॉमी म्हणजेच पित्ताशय नलिकेला छेद देऊन केल्या जाणाऱ्या उपचारांसाठी दाखल केले. तिथे या तरुणाच्या पित्त नलिकेतला खडा काढून उपचार करण्यात आले. मात्र या उपचारानंतरसुध्दा वेदना सुरूच राहल्याने त्याला नागपुरातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार होवूनही वेदनांची तीव्रता कायम राहली. मागील पाच वर्षांमध्ये तीन रूग्णालयातील उपचारांचा प्रवास करत हा तरूण अखेर सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात दाखल झाला.  या ठिकाणी धीरजला कोलेडोकोलिथीअ‍ॅसिस सोबतच कोलोडोकोलसिस्ट हा मूळ आजार असल्याचे निदान झाले. त्यासाठी पित्त नलिका पूर्णत: काढून छोटे आतडे थेट यकृताला जोडण्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. सिकलसेल आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांसाठी ही शस्त्रक्रिया अधिक जोखमीची असल्याची जाणीव शल्यक्रिया विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी येवला यांनी धीरजच्या आप्तांना करून दिली. मात्र धीरजने  शस्त्रक्रियेला संमती दिली.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*