कामगार वाचवा..देश घडवा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


कामगार वाचवा..देश घडवा*


उरण:- औद्योगिक क्षेञातील कामगार आता आत्महत्या करतील..?*_


थंड राहून षंढ होण्यापेक्षा अन्यायाविरोधात बंड करुन गुंड झालेलं आम्हांला मान्य आहे मोदी साहेब.._


_*होय मी भारतीय शेतकरी,कामगार व बेरोजगार...*_


_औद्योगिक क्षेत्रात सेटल मेंट करुन जर कोणी स्वताच्या संसारात पैसा वापरत असतील तर ते सगळ्यात नालायक समजावे..डोळ्यात तेल घालून वाचा.नाहीतर उद्या तापलेल्या सळया डोळ्यात घालायची वेळ येईल.कामगार तरुणांनों जागे व्हा.._ _जेव्हा जागे व्हाल तेव्हा सगळं संपलेलं असेल.आपले पंतप्रधान मोदी साहेब स्वतःच्या इगो आणि प्रतिमा टिकवण्यासाठी हा माणूस देश विकतोय.रेल्वे,बँक,एअरपोर्ट,सरकारी जागा,सरकारी एजन्सी असे सगळे वाटेल ते हा माणूस विकतोय (खासगीकरण)...जागे व्हा.. .._


_मोदी साहेबांनी विधेयक आणलं हे नीट माहितीये का ? मी विरोध करायचा म्हणून करत नाहीये.तुम्ही जर कंपनी मध्ये पर्मनंट असाल तर तुम्हांला कधीही कॉन्ट्रॅक्ट बेस वर आणलं जाईल.एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्टर किंवा त्या एजन्सी कोणाच्या आहे हे तुम्ही जाणून आहेत.तुम्ही पर्मनंट असतांना कॉन्ट्रॅक्ट बेस वर जर आले तर तुम्हांला कुत्रं सुद्धा विचारणार नाही.तुम्हांला लोन देताना बँक चार वेळा विचार करेल, तुम्हांला नोकरीची गॅरंटी राहणार नाही कारण तुम्हांला,कधीही कामावरून काढलं जाईल..मग त्या कॉन्ट्रॅक्टर चे तळवे चाटत बसावे लागतील.._


 _*एवढं शिक्षण तळवे चाटण्यासाठी घेतलं का ?*._


_तुम्ही या विधेयकामुळे काहीच करू शकत नाही.आधीच बेरोजगारीची कळस गाठला आहे.त्यात देशातील सगळी मीडिया विकत घेतली गेली आहे.हे चुकीचे काम मोदी साहेब करतात ते तुम्हांला दाखवले जाणार नाही कारण ते न दाखवण्याचेच पैसे मोदी साहेबांनी मीडियाला दिले आहे..।_


_सत्य परिस्थिती समजून घ्या. धर्माच्या आधारावर आपली पोट भरली जाणार आहे का?तुम्हांला धर्माच्या आधारावर भावनिक करून मोदी साहेब व इतर नेते हळूच त्याचा फायदा घेत आपल्या हक्काच्या गोष्टींवर गदा आणणारे नेते भरपुर आहेत.मोदी सरकारच्या एजन्सी आहे त्या फक्त खोटे मेसेज पसरवण्याचे काम करत आहे आणि तुम्ही त्याच गोष्टींवर विश्वास ठेवत आहे.आजच यांची तळी उचलायची तयारी करा अन्यथा आपल्या पुढच्या पिढीला तोंड दाखवायच्या लायकीचे आपण राहणार नाही..देशात माजलेली अराजकता थांबवण्यासाठी आवाज उठवा.सत्य परिस्थिती जाणून घ्या..._


_*अन्यथा आपला( शेतकरी,कामगार व बेरोजगार) यांचा अंत अटळ आहे..*_


_अरे मुर्दाड नेत्यांनो जिवंत आहेत का मेलात केंद्रसरकारने उद्योगपती आणी कंपन्याच्या हितासाठी भारतीय कामगारना घोडा लावला तरीही तुम्ही नेते लोक शांत आहात,कामगार तरुणांच्या बेरोजगार पिढ्या उध्वस्त होणार हे नक्की...._


_*शेतकरी,कामगार व बेरोजगार वर्गांवर अमानुष कायदे लागू..*_ _करून अत्याचार चालू राहतील कारण तिन्ही वर्गांच्या समस्या ही एकच असून वेगवेगळे लढतायेत,एकत्र येऊन लढावं लागेल फक्त निषेध केल्यामुळे कोणता प्रकारे बद्दल होणार नाही याचा विचार करण्याची गरज आहे याची झळ फक्त गोरगरीब कामगार शेतकरी व बेरोजगार जनतेला बसणार आहे.काही दिवसांनी आपणच आपल्या हाताने मतदान करुन या चोरानां सत्तेत बसवणारे आणि नंतर फक्त निषेध करत बसणार,फक्त फेसबुक वर निषेध करून पोट भरत राहणार आहोत का..?_


_मोदीसाहेब 6-6 कपडे बदलून मोरासोबत व्हिडिओ व फोटो बनवतात पण साहेब स्थलांतरित मजदूर रक्ताच्या थारोळ्यात चालत होते तेव्हा गप्प होते...हजारो लोक बेरोजगार झालेत गप्प आहेत.अर्थव्यवस्थेची वाट लागली गप्प आहेत..कर्जाचा डोंगर विक्रमी वाढलाय गप्प आहेत.शेतकरी कायदे करतांना शेतकऱ्यांना विचारल पण नाही.. कामगार कायदा तर लोकांना रस्त्यावर आणणारच आहे.भावांनो समर्थन करा पण आंधळं नका करू.मुलगा जर उपाशी राहीला तर बापाला पण प्रश्न करतो हे तर तुमचे सेवक आहेत.प्रश्न विचारा नाही तर देशाचा आणि आपला येणारा काळ अंधकारमय असेल हे नक्की.._


_डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना सविधानाच्या_


_माध्यमातून आधिकार मिळवून देताना लोकसभेत खूप संघर्ष केला होता ते ? कामगारांचे कायदे सहजपणे काढताना कामगारांना विचारले पण नाही. हूकूमशाही,भाडवलशाही व कंञाटीशाही मोदी साहेबांनी कामगारावर आली आहे.._


_शेतकर्‍यांचे व कामगाराचे बरं वाईट झालं तर ना मोदींच काही जाणार ना इतर नेत्याचे काही जाणार.तुमचा संसार,तुमच्या मुलाचं आयुष्य नक्की बरबाद होणार,अजूनही वेळ गेली नाही एक व्हा..|_


_*शेतकरी,कामगार व बेरोजगार..*_


_गुलामगिरीस पुनर्जीवन देण्याची उत्तम कार्य मोदींच्या नेत्रुत्वात लोकसभेत करण्यात आले आहे.कायम रोजगार मिऴण्याची शक्यता आता नष्ट करण्यात आली आहे.उद्योगपतींना रोजच्या कामासाठी कायम_ _कामगारांच्या ऐवजी कंत्राटी कामगार नेमण्याची सवलत नविन कायद्याद्वारे देण्यात आली आहे.म्हणजे हक्काच्या रजा,प्राव्हिडंड फंड, ग्रँच्युटी फंड, निव्रुत्ती वेतन,बोनस,यासारखे फायदे या कंत्राटी कामगारांना मिळणार नाहीत. ही पध्दत म्हणजे आधुनिक गुलामी आहे. मोदींनी व मालकांनी कायदेशीरपणे अति शोषण करण्याची तरतुद निर्माण केली आहे._


_*यालाच कामगारांचे अच्छे दिन म्हणायचे का ?*_


_फक्त शेतकरी संघटना,कामगार संघटना व बेरोजगार तरुण यांनीच आंदोलन करून उपयोग नाही ह़ोत, त्यासाठी सर्व भारतीयांनी या मध्ये सहभागी झाले पाहिजे..._


_*तरच भारत देश सुरक्षित राहील....*_


_*कामगार वाचवा..देश घडवा*_


_*होय मी भारतीय शेतकरी,कामगार व बेरोजगार...*_