माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जीवंतच मिळाली पाहिजे......बेपत्ता आई रागिणी गमरे यांचा आक्रोश*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जीवंतच मिळाली पाहिजे......बेपत्ता आई रागिणी गमरे यांचा आक्रोश*


*पुणे : -* कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आपल्या 33 वर्षीय मुलीला त्या आईने जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केले. ससून रूग्णालयातून याठिकाणी दाखल झालेल्या या रूग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र, बरी झालेल्या आपल्या मुलीला जम्बो कोविड बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडला आहे.


सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या आईला , 'तुमची मुलगी येथे दाखल 


नव्हती', अशी धक्कादायक माहिती सांगण्यात आल्याने त्या आईने आता


जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या


प्रिया गायकवाड या ३३ वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत, बेपत्ता महिलेच्या आई रागिणी गमरे यांनी जम्बो कोविड सेंटर येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून, यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे देखील यांच्या सोबतीला उपोषणाला बसले आहेत.


यावेळी बोलताना प्रिया गायकवाड यांच्या आई रागिणी सुरेंद्र गमरे म्हणाल्या की, "माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जीवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अँब्युलन्स मध्ये कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली, तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय पाहिजे आहे."


यावेळी बोलताना रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते


राहुल डंबाळे म्हणाले की, "करोडो रूपये खर्च करून आणि ठिकठिकाणी सीसीटिव्ही लावून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचा कारभार फार संतापजनक आहे. अशा प्रकारे या ठिकाणाहून एखादी व्यक्ती बेपत्ता होते, हा यंत्रणेतील दोष असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालून या आईला न्याय द्यावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. याप्रकरणी प्रशासकीय यंत्रणेने अद्याप मौन सोडलेले नाही. या प्रकरणाचा त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. याठिकाणा वरुन महिला बेपत्ता होणे ही बाब अतीशय चिंताजनक असून निंदनीय आहे.


यामधील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.