आपले सहकारी मित्र टीव्ही ९ वृत्तवाहीनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे निधन...... पुणे प्रवाह परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल**आपले सहकारी मित्र टीव्ही ९ वृत्तवाहीनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे निधन*


*पुणे :-* सर्व पत्रकार बंधू भगिनींना कळकळीची विनंती !


आपले सहकारी मित्र टीव्ही ९ वृत्तवाहीनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले, ते ४२ वर्षांचे होते. माझी सर्वाना विनंती आहे की, जीव धोक्यात घालून कोणतेही काम करू नका.आवश्यक असेल तरच फिल्ड वर काम करा, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपली दैनंदिन कामे करा. आवश्यक नसेल तर धाडस करू नका. कोणताही आजार असेल तर वेळेत डॉक्टर शी संपर्क साधा.


पांडुरंग रायकर यांना पण वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत असे समजतंय.सरकार प्रशासन हतबल आहे. गणपती उत्सव नंतर केसेस वाढतील असे अंदाज आहे.


आपण आपली आणि आपल्या कुटुंबियांची सर्वतोपरी काळजी घ्या.


ईश्वर रायकर यांच्या कुटुंबियांना दुःख पचवण्याची शक्ती देवो !


🌺🌷🌹💐💥🌸🌹🌷🌻💐🌺💥 *सा. पुणे प्रवाह परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली*🌹🌸💐🌺🙏🙏🙏🙏