पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहसनस्थ पुतळ्यासह आराखड्यास मान्यता, नगरसेविका उषा वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहसनस्थ पुतळ्यासह आराखड्यास मान्यता, नगरसेविका उषा वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश...... पिंपरी २१ सप्टेंबर


          पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिरासमोर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहसनस्थ पुतळ्यासह आराखड्यास नूतनीकरण करण्याचे स्वप्न साकार होत आहे. या कामासाठी सर्व शासकीय परवानगी व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व स्थानिक नगरसेविका सौ. उषाताई संजोग वाघेरे  पाटील यांच्या नियोजनबद्ध पाठपुराव्यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.


        या आराखड्यात नूतनीकरणासाठी शासकीय परवानगी त्यामध्ये कलासंचलनालय, मुंबई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ मुंबई , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी, पुणे या सर्व शासकीय विभागांची परवानगी प्रक्रिया पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या कामाची निविदा सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने काढण्याची संमती दिली आहे.


         भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहसनस्थ पुतळ्यासह आराखड्यामुुळे पिंपरी गावच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे. मराठी मातीचा स्वाभिमान जपत शिवछत्रपतींच्या विचारांना तरुणपिढीत नव्याने रुजवण्यासाठी सदरील कार्य मोलाचे ठरणार आहे. असे मत नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे (पाटील)


यांनी बोलताना व्यक्त केले.