घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशीलनगर येथील रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . -- आमदार सुनिल कांबळे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशील नगर येथील रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . असे स्थानिक आमदार सुनिल कांबळे यांची रहिवाश्याना आश्वासन दिले . यावेळी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष जॅक्सन अँथोनी , बापू माने , विपीन नायर , मुद्दसर शेख , जॅक्सन पानेम , रघु वाघमारे , गणेश जगताप ,लासी कांबळे व वसंत गायकवाड , रमेश पोळ , आकाश आवळे व शेकडो झोपडपट्टी वासीय उपस्थित होते 


        यावेळी आगवली चाळ हटवण्याच्या विषयावर ठोस निर्णय घेण्यात आले आहे, व रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडल्या जाणार नाही याची खात्री आमदार सुनिल कांबळे यांनी रहिवाश्याना दिली . यासाठी लवकरात लवकर डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेणार आहोत .


        आज कोविड १९ च्या महामारितुन संपुर्ण जग,भारत गंभीर संकटाचा सामना करत पुढे चाललेले आहे. तरी देखील येथील झोपडपट्टी वासियांचे अतिक्रमण असे घोषित करुन घरे सोडण्याबाबत नोटीसा दिलेल्या आहेत. अशी माहिती दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष जॅक्सन अँथोनी यानी दिली


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image