केअर टेकर्स सोसायटीतर्फे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास ऑक्सिजन क्रॉन्सट्रेटर मशीन व चार ऑक्सिपॉवर गॅस सिलेंडर भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल      केअर टेकर्स सोसायटीतर्फे ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत रुग्णांसाठी पर्यायी सोय म्हणून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास ऑक्सिजन क्रॉन्सट्रेटर मशीन व चार ऑक्सिपॉवर गॅस सिलेंडर आमदार सुनिल कांबळे यांच्याहस्ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गजभिये व आरोग्य समितीच्या प्रमुख नगरसेविका प्रियांका श्रीगिरी यांना भेट देण्यात आली . गोळीबार मैदानाजवळील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात हा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅम्प एजुकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका कल्पना मुळगावकर , महानगर गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे , आधार सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे , शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे , केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे , रवी सल्ले , विजय बेलिटकर , संजय असरकर , विष्णू दोषी , इरफान मुल्ला , रणजित परदेशी , ज्ञानेश्वर कांबळे , पवन देडगावकर , गणेश चित्ते , सुमित आगरवाल ,बाळकृष्ण गुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते .


     यावेळी प्रास्तविकात सांगितले कि , केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी सांगितले कि , कोरोनाच्या काळात केअर टेकर्स सोसायटीने अनाथ , वृध्दाश्रमांना मदत केली आहे . या राष्ट्रीय आपत्तीमुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले, यासाठी बेड पर्यंत रुग्णांसाठी पर्यायी सोय म्हणून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास ऑक्सिजन क्रॉन्सट्रेटर मशीन भेट देण्यात आले . यापुढील काळात केअर टेकर्स सोसायटीतर्फे पोलीस ठाणे व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना भेट देण्यात येणार आहे . तसेच , रिक्षा रुग्णवाहिकाना पाच ऑक्सिपॉवर गॅस सिलेंडर भेट देण्यात आले.


यावेळी आमदार सुनिल कांबळे यांनी सांगितले कि , केअर टेकर्स सोसायटी कार्य कौतुकास्पद आहे , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास ऑक्सिजन क्रॉन्सट्रेटर मशीन व चार ऑक्सिपॉवर गॅस सिलेंडर दिलेली भेट बहुमोल आहे . त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे .


    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशिधर पुरम यांनी केले तर आभार ऍड सुफियान शेख यांनी मानले .