पत्रकार संघातर्फे सभासद आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


*


पुणे आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दोनच  दिवसांपूर्वीच आरोग्यसेवा वेळेत न मिळाल्यानेआपल्या  एका  सहकाऱ्याला जीव गमवावा लागला आहे . या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघ, MVR welfare foundation आणि शिवसंग्राम संघटना यांच्या माध्यमातून पत्रकार संघाचे सभासद आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका पत्रकार संघाच्या आवारात २४ तास उपलब्ध असेल. त्यामुळे आपणापैकी कोणाही  सहकाऱ्याला किंवा त्यांच्या कुटुबियांसाठी अगदी कधीही गरज पडल्यास तात्काळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. 


(*ही रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध असेल. 


*ज्यांना ऐच्छिक देणगी स्वरूपाचे मूल्य द्यायचे असेल ते तसे देऊ शकतात. ती रक्कम थॅलेसेमिया रोगावर काम करणाऱ्या MVR welfare foundation या संस्थेला देण्यात येईल.) 


*टीप :- आज दुपारी 12.30 वाजता ऍम्ब्युलन्स पत्रकार संघाला हस्तांतरीत केली जाणार आहे.*


यासाठी संपर्क  :- प्रसाद कुलकर्णी ( अध्यक्ष )        ९८८१०९८३६९


 :- चंद्रकांत हंचाटे  ( सरचिटणीस )  ९५५२२५४७७७


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या