जीआयबीएफ'तर्फे अभियंत्यांचा सन्मान पुणे : ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


(जीआयबीएफ) राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या अभियांत्रिकीच्या क्षेत्रात, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात भरीव योगदान देणाऱ्या, अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. 'जीआयबीएफ'चे ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी, लीला पुनावाला फाउंडेशनच्या सहसंस्थापिका लीला पुनावाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कोरोनाची लक्षणे तपासण्यासाठी हजारो डॉक्टरांना उपयुक्त ठरलेले 'कोविड कवच' ऍप्लिकेशन बनवणाऱ्या दिमाख सहस्रबुद्धे, औषधे, रेशन किट व इतर साहित्य देऊन गरजूना दिलासा देणारे 'इडार्च'चे डॉ. दिलीप देशपांडे, आरोग्य व्यवस्थापनात काम करणाऱ्या डॉ. अभय कुलकर्णी, 'आयटी करिअर कौन्सिलिंग'च्या माध्यमातून हजारो लोकांना आयटीमध्ये रोजगार देणाऱ्या डॉ. दीपक शिकारपूर, क्युबिक टेकचे नितीन नायक आणि अश्विन बालवल्ली या अभियंत्यांना सन्मानित करण्यात आले.


डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, "अभियंते राष्ट्राच्या उभारणीत महत्वाचे योगदान देतात. जागतिक स्तरावर अभियंत्यांच्या कलात्मक कामगिरीमुळे ओळख निर्माण होते. आज आपण 'लोकल टू ग्लोबल'बाबत बोलत आहोत. हे ध्येय साध्य करण्यासाठी अभियंत्यांनी भारतीय उद्योगाला आणखी वेगळ्या उंचीवर नेण्याची आवश्यकता आहे." लीला पुनावाला यांनीही या अभियंत्यांचे अभिनंदन केले. अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणे ही चांगली गोष्ट आहे.