*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*
*नवी दिल्ली :-* सुधारित नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर, तिकीट का दिले 48 तासात द्यावे लागणार स्पष्टीकरण निवडणुक रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यांचा संपूर्ण तपशिल वृत्तपत्रात छापणे निवडणुक आयोगाने यापूर्वी सक्तीचे केले होते. परंतू आता जर गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या व्यक्तीस राजकीय पक्षाने उमेदवारी दिली असल्यास अशा व्यक्तीस उमेदवारी का दिली याचे स्पष्टीकरण उमेदवारी जाहिर केल्यापासून अठ्ठेचाळीस तासांत प्रत्येक राजकीय पक्षाला द्यावे लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुक आयोगाने नवीन मार्गदर्शक नियमावली प्रकाशित केली असून यामुळे गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या मंडळींचे धाबे दणाणले आहेत. प्रामुख्याने व्हाईट कॉलर इमेज निर्माण करण्यासाठी धडपडणार्या व सत्ताधार्यांबरोबर सातत्याने राहण्याचा प्रयत्न करणार्या या मंडळींना आता चाप बसू शकतो असे मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या निवडीचे कारण जाहीर करणे राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आले असून उमेदवारी जाहीर केल्यानंतर 48 तासाच्या आत इतर उमेदवारांच्या तुलनेतील योग्य निवडीचा तपशील संकेतस्थळावर, सोशल मिडियासह प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर करणे अनिवार्य असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने सुधारित मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. मतदारांच्या जनजागृतीसाठी सदरील मार्गदर्शक सूचनांची जाहिरात देशातील प्रमुख प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये संबंधित याचिका निकालात काढताना दिलेल्या निर्देशांचा विस्तारित मार्गदर्शक सूचनांचा समावेश करण्याचे आदेश निवडणूक आयोगास देण्यात आलेले होते. सर्वोच्च न्यायालय ऑर्डर दि. 13 फेब्रुवारी 2020 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने सविस्तरपणे निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांना उमेदवारी, नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर राजकीय पक्ष व संबंधित उमेदवाराने मतदारांच्या माहितीसाठी गुन्हे विषयक तपशील जाहीर करण्याची नियमावली जारी केली आहे.
नव्याने जारी केलेल्या निर्देशानुसार राज्यसभा, विधानपरिषद, नामनिर्देशित आणि बिनविरोध उमेदवारांना देखील गुन्हे विषयक माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक केले असून निवडणूक काळात तीन टप्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या उमेदवारांची माहिती स्थानिक वर्तमानपत्रासह, वृत्त वाहिन्या, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, राजकीय पक्षांचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी 3 वेळा प्रसिद्धी बंधनकारक होती मात्र निवडणूक काळात निश्चित दिवस ठरवून दिले नव्हते उमेदवारांच्या पार्श्वभूमीबद्दल मतदारांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे या हेतूने व त्याबाबत अधिक स्पष्टता नसल्याने सुधारित सूचना जारी केलेल्या आहेत. गुन्हेगारी प्रकरणातील व्यक्ती, ज्यांना उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहे, अशा उमेदवारांच्या निवडीची कारणे तसेच गुन्हेगारी पूर्ववर्ती नसलेल्या इतर व्यक्तींना उमेदवार म्हणून का निवडले जाऊ शकत नाही यासंबंधी माहिती राजकीय पक्षाने प्रसिद्ध केली पाहिजे. सुधारित मार्गदर्शक नियमावलीनुसार निर्दिष्ट कालावधी पुढील पद्धतीने तीन ब्लॉकसह निश्चित केले आहेत. त्याप्रमाणे अ) माघार घेतल्यानंतर पहिल्या 4 दिवसात., बी) पुढील 5 ते 8 व्या दिवसात., सी) 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (मतदानाच्या तारखेपूर्वीचा दुसरा दिवस) असे आहे. उदाहरणार्थ माघार घेण्याची शेवटची तारीख महिन्याची 10 तारीख असेल आणि मतदान महिन्याच्या 24 तारखेला असेल तर, घोषणेस प्रकाशित करण्यासाठी पहिला ब्लॉक महिन्याच्या 11 ते 14 तारखे दरम्यान केला जाईल, दुसरा आणि तिसरा ब्लॉक 15 ते 17 दरम्यान असेल. त्या महिन्याचा अनुक्रमे 18 व 19 आणि 21 वा. असे प्रसिद्ध करण्याचा कालावधी राहील. सदरील सर्व खर्च निवडणूक खर्च नोंदवहीत समाविष्ट करणे अनिवार्य आहे.