जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*


**आतापर्यंत 832


रुग्णांवर उपचार, 427 डिस्चार्ज*


पुणे : जम्बो कोविड रुग्णालयातील सुसज्ज बेडची संख्या 400 झाली आहे. येथील यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात आढावा बैठकीत COEP येथील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची सूचना केली होती. त्याचप्रमाणे महापौर मुरलीधर मोहोळ हे जम्बोची क्षमता वाढवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्या अनुषंगाने येथील यंत्रणा राबविण्यात येत आहे.  


     सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड रूग्णालय सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत वेळोवेळी एकूण 832 करोना रुग्ण दाखल करण्यात आले. त्यापैकी 427 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.


'जम्बो'मध्ये तयार करण्यात आलेल्या चारशे खाटांपैकी 340 खाटा ऑक्सिजन व्यवस्थेने सज्ज आहेत. तर 30 खाटा अतिदक्षतेसाठी सुसज्ज करण्यात आल्या आहेत. याशिवाय उर्वरित 30 खाटांना व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.णे प्रवाह न्युज पोर्टल