पुणे विभागातील 2 लाख 51 हजार 521 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,         विभागात कोरोना बाधित 3 लाख 36 हजार 395 रुग्ण                                   -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



  पुणे,दि.15 :- पुणे विभागातील 2 लाख 51 हजार 521 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 36 हजार 395 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 76 हजार 141 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.77 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हा


  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 27 हजार 307 रुग्णांपैकी 1 लाख 81 हजार 315 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 881 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.25 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.77टक्के आहे. 


सातारा जिल्हा


   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 24 हजार 578 रुग्णांपैकी 15 हजार 594 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 294 आहे. कोरोनाबाधित एकूण 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


सोलापूर जिल्हा


    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 386 रुग्णांपैकी 17 हजार 601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


  सांगली जिल्हा


               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 24 हजार 39 रुग्णांपैकी 13 हजार 805 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 341 आहे. कोरोनाबाधित एकूण 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा


  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 35 हजार 85 रुग्णांपैकी 23 हजार 206 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 790 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे 


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार ने 256 वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 481 , सातारा जिल्ह्यात 629 , सोलापूर जिल्ह्यात 547, सांगली जिल्ह्यात 847 तर कोल्हापूर जिल्ह्यात 752 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख 89 हजार 506 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 36 हजार 395 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 


( टिप :- दि. 14 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


                         *****