यशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पिंपरी : दिनांक २२ सप्टेंबर २०२० : यशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेच्या चिंचवड येथील प्रांगणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


       यावेळी आपल्या मनोगतात संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेत त्यांनी स्वतःच्या कार्यातून दिलेला श्रमप्रतिष्ठेसोबत ज्ञानार्जन करण्याचा दिलेला संदेश आजही सर्वांना उपयुक्त आहे, असे सांगितले. यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या अध्यापक व अन्य सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 


फोटो ओळ : यशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील व अन्य प्राध्यापक वर्ग.